देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे, डाॅक्टरांसह आरोग्य कर्मचारांचा तीव्र निषेध…

मुंबई, दि. १२ जुलै २०२०: कोरोना काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा चालू आहे. ज्या मधे ते कोरोना आजराच्या सद्य स्थिती बाबत पाहणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे आघाडी सरकारला सारखेच धारेवर धरत आहेत. तर अनेक जण कामाच्या बाबतीत त्यांचा हा सक्रियपणा पाहून चांगले शब्द बोलत आहेत. तर विरोधक सत्तेत आसताना हि कामें केली आसती तर अशी वेळ आली नसती आशी बोचरी टिका करत आहेत.

देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ज्या भागांची पाहणी करत आहेत तिथे ते सरकार आपयशी असल्याचेच सुर धरत आहेत. ज्यामुळे आता ते नेमके पाहणी करुन मदत करत आहेत की प्रशासान आणि आरोग्य विभागाचे खच्चीकरण करत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.

नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौरा केला. गोदावरी हॉस्पिटलमध्ये रुग्णाची गैर सोय होते. सेवा शुश्रूषा व्यवस्थित होत नसल्याचा तथ्यहीन आरोप केला. जळगावमध्ये उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे. तसंच कामबंद करण्याचा इशाराही दिला.

‘गेल्या दोन महिन्यांपासून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार असे अनेक जण स्वत:च्या घरापासून लांब राहुन रात्रंदिवस रूग्णसेवेसाठी राबत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काही तथाकथित राजकीय नेत्यांकडून केला जात आहे’ असं स्पष्ट मत  रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

या सर्व परिस्थिती मुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याची पाहणी करत फक्त सरकारला धारेवर धरायचे काम आणि स्वताहा कडे लक्ष वेधण्यासाठी असे कृत करतायत आसे चित्र उभा राहते आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा