मुंबई, दि. १२ जुलै २०२०: काल रात्री बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन या दोघांचे कोविड -१९ चे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे देखील अहवाल चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. आज बच्चन यांच्या कुटुंबातील कोविड -१९ चे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ऐश्वर्या राय-बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बॉलीवुड मधल्या अभिनेत्यांना कोविड -१९ ची लागण होण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.
शनिवारी रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. या दोघांनाही मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर सध्या रुग्णालयाच्या अलगीकरण वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. असे दिसून येते की दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची पुष्टी केली आहे. त्यांनी ट्विट केले- ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आहेत. श्रीमती जया बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट नकारात्मक आला आहे. बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची प्रार्थना आहे.
ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या आणि जया बच्चन यांची शनिवारी रात्री कोविड -१९ ची चाचणी नकारात्मक आली होती. त्यानंतर आज मात्र त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण जया बच्चन यांची तपासणी नकारात्मक आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने बच्चन यांच्या बंगल्याचे निर्जंतुकीकरण केले आहे. ऐश्वर्या राय-बच्चन आणि तिची मुलगी आराध्या हिला रुग्णालयात हलवण्यात येणार आहे की घरामध्येच त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत याबाबत अजून खुलासा करण्यात आलेला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी