राजस्थान, दि. १३ जुलै २०२०: अशोक गहलोत यांच्या राजस्थानमधील सरकारचा सुरू असलेला पेचप्रसंग अखेर निवडताना दिसत आहे. सोमवारी दुपारी अशोक गहलोत यांनी शंभराहून अधिक आमदारांचा पाठिंबा माध्यमांसमोर दाखवून आपला विजय घोषित केला. हे स्पष्ट आहे की अशोक गहलोत यांनी बहुमत असल्याचे संदेश दिले आहेत आणि सचिन पायलटचे सर्व दावे चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे.
अशा परिस्थितीत आता सचिन पायलट कोणती पावले उचलणार यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सचिन पायलट सतत २५ हून अधिक आमदार असल्याचा दावा करत होते. सचिन पायलट यांनी म्हटले आहे की आम्ही कराराची कोणतीही अट ठेवली नाही, आणि कोणत्याही उच्च कमांडशी त्यांचे बोलणे चालू नाही.
पायलट गटाचे म्हणणे होते की अशोक गहलोतचे केवळ काँग्रेसचे ८४ आमदार आहेत, बाकीचे आमच्यासोबत आहेत. मात्र आता सचिन पायलट यांचे सर्व दावे खोटे ठरले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी