हरित इंदापूरसाठी वृक्षारोपण उपक्रम स्तुत्य- अंकिता शहा

इंदापूर, दि. १४ जुलै २०२०: इंदापूर नगर परिषदेचे कर्मचारी दिपक शिंदे यांनी आपल्या ४० व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर, स्मशानभूमी, मुख्याधिकारी निवास तसेच कचरा प्रक्रिया केंद्र येथे विविध पद्धतीची फुले, फळांची बहुपयोगी ४१ झाडे लावून आपला वाढदिवस साजरा केला. हरित इंदापूरसाठी असे उपक्रम स्तुत्य असल्याचे नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी आपले मत व्यक्त केले.

अंकिता शहा म्हणाल्या कि,’ वृक्षसंवर्धन प्रत्येकाची जबाबदारी असून पर्यावरण संतुलनासाठी हे महत्त्वाचे आहे. भार्गव मंदिरालगत तसेच टेलिफोन ऑफिस शेजारी विकसित केलेले छोट्या स्वरूपाचे वन यासारखे वन विकसित करण्याकडे आपला प्रयत्न आहे. दिपक शिंदे यांनी अशा प्रकारचा उपक्रम हाती घेऊन विधायक कार्य केले आहे.’

इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल तसेच गटनेते कैलास कदम व इंदापूर कर्मचारी संघटनेचे प्रमुख मोहन शिंदे, गजानन पुंडे, सुरेश सोनवणे, अल्ताफ पठाण, आरोग्य निरीक्षक बारटक्के, अशोक चिंचकर, लिलाचंद पोळ यावेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा