कर्जत, दि. १४ जुलै २०२०: कर्जत तालुक्यातील पठारवाडी येथे राॅटरी क्लब आॅफ कर्जत सिटी भारतीय जैन संघटना आणि कर्जत तालुका हरित अभियान यांच्या वतीने रोज श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात येते. या ठिकाणी आज पर्यंत दोन हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे. आज दिनांक १४ रोजी आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन श्रमदान करून वृक्षारोपण केले.
कर्जतचे आमदार रोहित पवार म्हणाले की, सध्या भावी पिढीसाठी पर्यावरण वाचवण्याची गरज आहे. संपुर्ण देश जग पर्यावरणमुळे संकटात आले आहे असे पाहण्यास मिळत आहे. पुढे पवार बोलतांना म्हणाले की मोठ्या प्रमाणावर युवक, वकील,डाॅ, व्यावसायिक, व्यापारी हे सर्व एक जुटीने येऊन आपल्या परिसरासाठी गावासाठी पुढील पिढीसाठी या ठिकाणी वृक्षारोपण करत आहे.
झाडे कोणती लावावीत यांचे नियोजन करून ते लावले जातात. झाडामधील अंतर किती असावे याचे देखील प्रमाण ठरवले आहे. कोणत्या झाडामुळे फायदा होईल यांचे नियोजन योग्य असल्याचे देखील आमदार रोहित पवार यांनी या वेळी सांगीतले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष