चीन, दि. १५ जुलै २०२०: चीन सरकारने गलवान खोऱ्यामध्ये भारतासोबत झालेल्या हिंसक चकमकीनंतर आपले चाळीसच्या आसपास सैनिक गमावले होते. या सैनिकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील त्यांनी नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर या मृत सैनिकांच्या घरच्यांना देखील या सैनिकांचा अंत्यविधी किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणतेही विधी करण्यास मनाई केली आहे. असे करून चीन गलवान खोऱ्यामध्ये आपले झालेले नुकसान लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
चीनमध्ये उपस्थित असलेल्या अमेरिकी गुप्तचर स्रोतांनी ही माहिती दिली आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे की, अंत्यसंस्काराच्या कोणत्याही विधी गलवान खोऱ्यात मारलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांनी करू नयेत. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की जर अंतिम संस्कार करायचे असतील तर एका निर्जन जागी जा. शेवटचे संस्कार पूर्ण झाल्यानंतर कोणताही समारंभ करू नका. तथापि, कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती दाखवून सरकारने अंतिम संस्कार करण्यास नकार दिला आहे.
बीजिंगमधील सरकारची इच्छा आहे की गलवान खोरे आणि त्यात ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या घटनेबद्दल चीनच्या लोकांना कमीत कमी माहिती जाईल तसेच गलवान खोऱ्यातील चीन करत असल्या कृत्त्यांविषयी देशातील नागरिकांना कोणत्या गोष्टी कळू नयेत.
यामागे चीनचा असा मानस आहे की जर चीनने ४० सैन्य गमावले आहेत ही घटना देशातील नागरिकांपर्यंत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली तर पीपल लिबरेशन आर्मी ची सर्वत्र नाचक्की होईल. त्यामुळे चीन आपल्या सैनिकांचा अंत्यसंस्काराचा विधी लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी