चीन सीमेवर पॅरा कमांडो कडून शक्तिप्रदर्शन…..

लडाख, दि. १७ जुलै २०२०: चिनी सैन्याने लडाख येथून माघार घेतली आहे, परंतु शुक्रवारी सकाळी भारतीय सैन्याने आपली उपस्थिती नोंदविली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज लेहच्या स्टाकना येथे दाखल झाले. पॅरा कमांडोजने संरक्षणमंत्र्यांसमोर चमकदार कामगिरी केली. ज्या भागात भारतीय सैन्य आपल्या युद्ध अभ्यासादरम्यान शक्तीप्रदर्शन करत आहे त्या जागेपासून केवळ २ किलोमीटर अंतरावर चिनी सैन्य तैनात आहे.

पेंगोंग तलावाजवळ सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या सैनिकांनी युद्ध अभ्यास केला पेंगोंग लेक हा एक तो परिसर आहे जिथे भारत आणि चीनचे सैनिक पहिल्यांदा समोरासमोर आले होते . आज भारत पेंगोंग तलावाजवळ आपले सामर्थ्य दाखवित आहे.

पूर्व लडाखमध्ये जेव्हा भारत आणि चीनमधील वाद सुरू झाला तेव्हा पॅरा कमांडोला आग्रा व इतर भागातून लडाखमध्ये पाठवण्यात आले होते. लडाखमध्ये सातत्याने वाढत असलेला तणाव पाहता हे पॅरा कमांडो लडाख मध्ये तैनात करण्यात आले होते. पॅरा कमांडो युद्ध करण्यासाठी लढाई करण्यासाठी गलवान व्हॅली, पॅनगाँग लेक आणि दौलत बेग ओल्डि अशा उंच पर्वतीय भागात तैनात होते. शुक्रवारी सैन्य कवायतीत भारताच्या रणगाडे आणि सशस्त्र कमांडोनी जबरदस्त प्रात्यक्षिके दिली.

दोन्ही देशांकडून लडाखमध्ये सुरू असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चिनी सैन्यदेखील मागे हटण्यास सुरुवात झाली आहे. तरीसुद्धा अशा तलावामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पॅरा कमांडो या स्थितीसाठी पूर्णपणे सज्ज आहेत. तसेच शत्रूच्या भागात जाऊन ऑपरेशन्स करण्यासाठीदेखील पॅरा कमांडर तयार आहेत.

पॅरा कमांडो १३,८०० फूट उंचीपासून ऑपरेशन करीत आहेत. पेंगोंग तलावाजवळ हवाई दलाची अनेक हेलिकॉप्टर्स फिरत आहेत. हे तेच पॅरा कमांडो आहेत ज्यांनी सर्जिकल स्ट्राइक दरम्यान आतंकवाद्यांना सळो की पळो करुन टाकले होते.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा