मुंबई, २२ जुलै २०२० : देशातील व राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोजची आकडेवारी तीस हजारांच्या वर जात आहे. तसेच आता हे देखील मान्य करण्यात आले आहे की देशांमध्ये “कम्युनिटी स्प्रेड” होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच काल सलग पाचव्या दिवशी करोनाच्या रुग्णांमध्ये ३० हजारांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांमध्ये देशात ३७ हजार १४८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ११ लाख ५५ हजार १९१ झाली आहे. देशातील मृतांचा आकडा २८ हजार ८४ वर पोहोचला आहे.
राज्यात ८ हजार ३६९ नवे रूग्ण
आज राज्यात गेल्या २४ तासात ८ हजार ३६९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात २४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आत्ता पर्यंत ७ हजार १८८ कोरोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार २१७ रुग्णांना डिस्चार्ज मिळून ते घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या म्हणजेच रिकव्हरी रेट ५५.७२ टक्के इतका झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रातला मृत्यू दर ३.७५ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी