पुणे, दि.२२ जुलै २०२०:प्रचंड राष्ट्रनिष्ठा त्याग समर्पणाच्या भावनेने समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे सर्वांचे लाडके (ज्ञापु ) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये ऑनफील्ड काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना डायबेटीस व इतर त्रास असल्याने त्यांची तब्येत खालावत गेली.
आज दुपारी त्यांचे दु:खद निधन झाले. पुण्यातील झोपडपट्टीतील कष्टकरी, मोलकरीण माता भगिनींच्या मुलांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. महाराष्ट्रातल्या गडचिरोली पासून मुंबई पर्यंत अनेक शासकीय अधिकारी घडविण्याचे असामान्य कार्य ज्ञानेशजी पुरंदरे यांनी केलं.
त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व म्हणजेच सामाजिक परिवर्तन होते.अचाट विद्वत्ता लाभलेल्या पुण्यासारख्या शहरात एक ना अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी वर्धिनीचे वेगळेपण जपण्याचं काम त्यांनी संबंध आयुष्यभर केलं. ज्ञानेशजी पुरंदरे यांची कायम शिकवण होती “थांबायचं नाही चालत राहायचं अविरतपणे चालत राहायच.”
त्यांच्या अत्यंसंस्कारासाठी घरातील फक्त ३ व्यक्तींना PPE किट घालून जायला परवानगी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे