नवी दिल्ली, दि. २३ जुलै २०२०: राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी काल राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे राजीव सातव, मल्लिकार्जुन खरगे, भाजपाचे डॉ. भागवत कराड, छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी शपथ दिली.
उदयनराजे भोसले यांचा शपथविधी….
भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची पहिल्यांदाच शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली यानंतर त्यांनी, “जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा दिली. यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांना “सदनातील नवीन सदस्यांना सांगतो की, हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाणार आहे. सदनात कोणतीही घोषणा देता येणार नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या” असा समज
उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिला.
नेटकरी संतापले
आधीच गेल्या काही दिसांपासून अनेक स्टँडअप काॅमेडियनचे महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानाचे व्हिडीओ हे बाहेर येत असून अनेक शिवप्रेमींच्या भावना या दुखावल्या जात आहेत. दरम्यान छत्रपती उदयनराजेंना घोषणेवर समज दिल्या प्रकरणी नेटिझन्स हे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्या वर चांगलेच संतापले आणि अवघ्या काही तासातच त्यांना ट्रोल केले जाऊ लागले. तसेच त्यांनी घोषणेवर घेतलेल्या अक्षेपामुळे छत्रपती शिवाजी महारांजाचा त्यांनी आपामान केला अशी प्रतिक्रीया सोशल मिडिया मधे उठून आली. या व्हिडिओवर अनेकांनी भाजपाला ही चांगलेच टोले लगावल्याचे दिसून आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी