महिलांनी बाहेर न जाता घरीच साजरी केली नागपंचमी

लोणी काळभोर, दि. २५ जुलै २०२०: दरवर्षी नागपंचमी मोठ्या उत्साहात संपन्न होत असते मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक महिलांनी बाहेर न जाता आपल्या घरीच नागोबाचे चित्र भिंतीवर लावून व आपल्या घरातील देवघरात ठेवून पूजा केली. समृद्ध अधिवासाचे प्रतिक, शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ग्रामीण भागातील महिलांनी सोमवारी आज नागपंचमी वारुळाची पूजा न करता घरीच साजरी केली.

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नागांचे पूजन करण्यास बंदी असल्याने महिलांनी नागाच्या प्रतिमेच्या पूजन करण्यावर भर दिला. नागपंचमी हा श्रावणातील महत्त्वाचा सण या दिवशी श्री शंकर आणि नागाचे पूजन करून पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे. या वेळी शनिवारी नागपंचमी आल्याने महिलांनी घरातच नागाच्या प्रतिमेचे तर काहींनी टेकडीवर जाऊन वारुळाचे पूजन केले. काही वर्षापूर्वीपर्यंत नागपंचमीच्या दिवशी गारूडी सकाळी नागाला पेटाऱ्यात घेऊन गल्लोगल्ली फिरायचे. नागरिक याच नागाला दुधाचा नैवेद्य दाखवायचे.

मात्र, वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार नाग बाळगण्यास तसेच जिवंत नाग पूजनावर बंदी आली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून बाजारपेठेत नागाच्या आखीव रेखीव मूर्तीही उपलब्ध झाल्या आहेत. यंदाही महिलांनी या प्रतिमांचे पूजन केले.

सणानिमित्त घरोघरी पुरणाचे दिंड करून देवाला नैवेद्य दाखविण्यात आला. वन विभागाकडून दर नागपंचमीला कारवाई केली जात असल्याने गारुड्यांच्या संख्येवरही नियंत्रण आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा