सोलापूर, २९ जुलै २०२० : जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांनी पंधरा वर्षांवरील सदस्यांच्या आधार सिडींगचे काम पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन केलेले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र- ड यादीत समावेश असलेल्या कुटुंबांचे आवास प्लस अॅपद्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे.
या प्रक्रियेतील आधार सिडींगचे काम गावपातळीवर सुरू आहे. तरी, संबंधितांनी सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याशी तातडीने संपर्क साधून कुटुंबातील पंधरा वर्षावरील सदस्यांचे आधार सिडींगचे काम पूर्ण करून घ्यावे. आधार सिडींग ३१ जुलै २०२० पर्यंत करण्यात येणार आहे. अशी बाब,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आलेल्या आहेत.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड