यापुढे लॉकडाऊन नको, प्रकाश आंबेडकरांच आवाहन 

मुंबई, दि. ३० जुलै २०२०: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी सरकारने पुन्हा लॉकडाऊन करून नका म्हणून काही दिवसांपूर्वीच सरकारला इशारा दिला होता. लॉकडाऊन केल्यास आम्ही तो मोडीत काढू असंही आंबेडकर म्हणाले होते. आता पुन्हा त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यांनी स्वतःचे केस कापून घेत जनतेला सामान्य आयुष्य जगण्याची सुरवात करण्याचं आवाहन केलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले कि,
”यापुढे लॉकडाउन नको…! मजूर, न्हावी, धोबी, लोहार, कुंभार, चांभार इत्यादी अलुतेदार बलुतेदारांचे व्यवहार पुन्हा सुरू झाले पाहिजे. लॉकडाउनमुळे झालेल्या भीषण आर्थिक नुकसानीमुळे त्यांना विशेष मदत पुरवण्याची सुद्धा गरज आहे. आज नाभिक बांधवाकडे जाऊन केस कापून घेतले व सर्वसामान्य जनतेने आपले सामान्य जीवन पुन्हा सुरू करण्याचा संदेश दिला.”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतरही अनेकदा हे लॉकडाऊन वाढवण्यात आले. आज जवळपास चार महिने होऊनही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लॉकडाऊन सुरुच आहे. मात्र सततच्या लॉकडाऊनमुळे तळहातावर पोट असणारे श्रमिक, मजदूर, न्हावी, धोबी, लोहार, कुंभार, चांभार संसारख्या अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय लोकांनाही आता जास्त काळ घरी राहणे कठीण झाले आहे. जिल्हाबंदी असल्याने अनेक लोक दुसऱ्या घरापासून दूर अडकून पडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडूनही आता हे लॉकडाऊन संपवण्याची मागणी होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा