समस्यांच्या विळख्यात इन्फोसिस…..

इन्फोसिस सारख्या दिग्गज कंपनीवर विसल ब्लॉवर ने खूप सारे आरोप लावले आहे. परंतु ते लावले गेलेले आरोप अज्ञात कर्मचाऱ्यांकडून लावण्यात आले आहे ज्यांची नावे अजूनही माहित नाही. या कारणामुळे इन्फोसिसच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणावर कोसळली.
आज आपण समजून घेऊयात की, नक्की कोणती कारणे होती. ज्यामुळे कंपनीवर असे गंभीर आरोप लावण्यात आले आणि त्यामागची कारणे समजून घेऊ या.
कंपनीने आपला नफा बॅलन्स सिटवर जास्त दाखवला. त्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किमतींमध्ये वाढ होते. या वाढत्या किमतीमुळे गुंतवणूकदार कंपनीच्या शेअर्सकडे आकर्षित होतात. हा प्रकार कंपनीतील कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पत्रामार्फत घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. हे पत्र अज्ञात कर्मचाऱ्यांनी दोन ठिकाणी पाठवले पाहिले म्हणजे बोर्ड ऑफ इन्फोसिस आणि दुसरे म्हणजे अमेरिकेमध्ये असलेल्या सिक्युरिटीज अंड एक्सचेंज कमिशन (जसे आपल्या इथे भारतामध्ये सेबी आहे) पाठवण्यात आले. या पत्रात असे म्हटले आहे की कंपनी आपल्या आर्थिक अहवालामध्ये कंपनी नफ्यामध्ये असल्याचे भासवत आहे. या गैरप्रकाराविषयी पुरावे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. जसे की ई-मेल, ध्वनिफीत इत्यादींसारखे पुरावे असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे. या पत्राचा फोटो या लेखासोबत देत आहे. पत्रामध्ये कंपनीचे कर्मचारी स्वतःची ओळख लपवताना दिसत आहेत.

लावले गेलेले आरोप ..
पत्रामध्ये कंपनीमधील दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आला आहे. त्यातील पहिले अधिकारी म्हणजे कंपनीचे सीईओ सलिल पारेख आणि दुसरे अधिकारी कंपनीचे सीएफ निरंजन रॉय आहेत. कंपनीचा सीईओ हा कंपनीचा सर्वोच्च अधिकारी असतो आणि कंपनीचा सीएफ म्हणजे कंपनीचे सर्व आर्थिक धोरण ठरवण्याचा अधिकार असतो. याच मुख्य दोन अधिकाऱ्यांवर पत्रामध्ये आरोप लावण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांवर लावलेले आरोप…
कंपनीच्या सीईओवर असा आरोप ठेवण्यात आला आहे की, कंपनीचे जे इतर कंपनीसोबत व्यवहार झाले होते. त्या व्यवहारांमध्ये झालेला नफा हा वाढवून दाखवण्यास सांगितले होते. ज्या व्यवहारांमध्ये कंपनीला कोणताही नफा झाला नाही किंवा नुकसान झाले होते. त्यामध्येही नफा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकारामुळे कंपनीचा बॅलन्स शीटमध्ये कंपनी नोकियामध्ये असल्याचे दिसत आले. अशा प्रकारच्या समस्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर येत असतील तर सहाजिकच कंपनीचे कर्मचारी कंपनीच्या सीएफ जो कंपनीचे सर्व आर्थिक धोरण पाहत असतो. त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. परंतु कंपनीच्या सीएफने कर्मचाऱ्यांना या मुद्द्यावरून कोणतीही शंका निर्माण करण्यास विरोध केला. कंपनी रंग जेथे नफा झाला होता. वस्तुतः तिथे कंपनी तोट्या मध्ये होती. इन्फोसिस कंपनी ही सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी असल्याने कंपनीचे उत्पादन व सेवा इतर देशांमध्ये दिले जात होते. या सर्व प्रक्रियेमध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांना देशाबाहेर जाणे-येणे होत असे. यामध्ये होणारा विसा खर्च असो किंवा यासारखे इतर खर्च कंपनीचा बॅलन्स शीटमध्ये नोंदवले गेले नव्हते. इतर कंपन्यांसोबत झालेले करार जे नंतर रद्द झाले होते ते करार बॅलन्स शीट मधून काढले गेले नव्हते ते करार चालू असल्याचे भासवले गेले होते. तसेच कंपनीचे इतर कंपन्यांसोबत झालेल्या व्यवहारांच्या आकड्यांमध्ये वाढ करून दाखवण्यात आली. या सर्व गैरप्रकारांचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. इथे बघितलं तर कंपनीचे सीईओ आणि आणि कंपनीचे सीएफओ हे कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणून कंपनीची आर्थिक स्थिती ठीक असल्याचे भासवत होते. या गोष्टींचा कंपनीवर असलेल्या लोकांच्या विश्वासावर परिणाम होतो. चौकशी मधून समजून येईलच की किती आरोप सिद्ध होत आहेत. घडलेल्या या प्रकारामुळे कंपनीचा शेअर सोळा टक्क्यांनी घसरला होता. हे घसरण मागच्या सहा वर्षातील सर्वात मोठी घसरण म्हणून ओळखली गेली.

                                                                                                               ईश्वर वाघमारे -पुणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा