इंदापूर (प्रतिनिधी) दि.३ ऑगस्ट २०२० : सत्यशोधक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि.१ ऑगस्ट रोजी इंदापूर शहरातील साठेनगर येथे सुशिक्षीत तरूणांच्या स्पर्धा परिक्षा आणि वाचन संस्कृती जतन करण्याच्या अनुषंगाने सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात आले आहे .
काळाची गरज लक्षात घेता सुशिक्षित , युवा पिढीला वाचनाचा छंद जोपासता यावा, तरूणांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या उद्देशाने या वाचनालयाची समिती स्थापन करण्यात आली. या वाचनालयाचे तात्विक उद्घाटन करून याचे संपूर्ण काम पुर्णत्वास नेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली.
या वाचनालयाचे संपूर्ण अधिकार आणि कार्य मिटिंग मधील एकमताने मंजूर झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष :- उमेश ढावरे
उपाध्यक्ष :- संजय ऊत्तम सानप,
कार्यध्यक्ष:– मयुर राजु ढावरे,
सचिव:-दादासाहेब मारूती सोनवणे,
खजिनदार:- नंदू संदीपान खंडाळे,
तसेच सदस्य:- विकास बाळू आडसुळ, गोरख दत्तू ढावरे, रोहित भागवत ढावरे, हर्षल राजु शिंदे, वैभव हरिदास ढावरे आणि विकास बंडू साठे.
यांसह वाचनालय कार्यकारिणी समितीवरती सर्वोनूमते नियुक्ति करण्यात आली. सदर मिटींगसाठी समाजातील सर्व जेष्ठ आणि तरूण उपस्थीत होते .
न्युज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे