अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा

मुंबई, ४ ऑगस्ट २०२० : अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे.
‘बस बहनें देती है १०० % रिटर्न’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. या चित्रपटाचे पोस्टर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

‘रक्षाबंधन’ हेच चित्रपटाचं नाव असून त्यावरून हा चित्रपट बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असल्याचं स्पष्ट होतंय. या पोस्टरमध्ये अक्षयसोबत त्याच्या चार बहिणी पाहायला मिळत आहेत. त्याच्या हातावर राख्यासुद्धा बांधलेल्या आहेत.

आनंद एल राय सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून ५ नोव्हेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा