पुणे, ४ ऑगस्ट २०२० : पुणे शहरातील सोमवारी( दि.३) रोजी दिवसभरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५८ हजार ३०४ इतकी झाली आहे.
त्यात गंभीर रुग्ण ६३३, व्हेंटिलेटरवर ३८९ नवीन कोरोना बाधितांपेक्षा दुपटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याशिवाय ७८१ नवे रुग्ण आढळले, तर १८२२ रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण ३९,९३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १६, ९८१ झाली आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८ हजार ३०४ आहे, तर १८ मृत्यू झाले असून एकूण मृत्यू १३८४ झाले आहेत.
सोमवार दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी ४६०४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून पुणे शहरात आतापर्यंत एकूण २ लाख ८६ हजार ४४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
त्यापैकी एकूण ५८,३०४ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत, तर १६,९८१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी