यंदा गतवर्षी पेक्षा जास्त पाणी साठा

यंदा ऑक्टोबर संपत आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे धरणांमध्ये गतवर्षी पेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. जून पासून सुरू झालेला हा पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत सतत चालू आहे. पुण्यातील धरणांतील पाणीसाठा पूर्ण झाला आहे. जूनपासून ते २६ ऑक्टोबर पर्यंत तेमघरच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ५१७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण शनिवारी अखेर २८.८४ अब्ज घनफूट पाणीसाठा असून गेल्यावर्षीच्या तुलनेत साडेतीन टीएमसी हून अधिक आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस त्यात काही प्रमाणात घट होते परंतु धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधून-मधून पाऊस पडत आहे त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व घरणात विपुल पाणीसाठा आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा