पुणे, ५ ऑगस्ट २०२०: आज पासून पुणे शहरात पी १ आणि पी २ ही पद्धत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व दुकाने आता सरसकट उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. त्यामुळे आजपासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व बिगर अत्यावश्यक दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहेत.
पी १ आणि पी २ ही पद्धत महापालिकेतर्फे लागू करण्यात आली होती. मात्र व्यापारी वर्गाला यामुळे अडचण निर्माण होत होती, म्हणून ही पद्धत बंद करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली होती. या पद्धतीमुळे व्यापारी वर्ग डबघाईला आला होता. मात्र, आता सर्व दुकाने आजपासून खुली होणार असल्याने व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे