घंटानाद होणार कळताच पोलीसांनी सकाळीच बंद केली मंदिरे

राजगुरुनगर, ५ ऑगस्ट २०२०: आज अयोध्येत राम मंदिर भुमिपुजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा झाला या सोहळ्याचा संपुर्ण देशात आनंदोत्सव साजरा होत असताना क्रांतीकारक हुतात्म्यांची जन्मभूमी असलेल्या राजगुरुनगर मधील प्रत्येक मंदिरात १० मिनिटे घंटानाद होणार होता मात्र पोलीसांनी अचानक सकाळी मंदिरे बंद केल्याने राजगुरुनगर वासियांना या आनंदोत्सवात सहभाग नोंदविता न आल्याने हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी राज्य सरकारच्या आदेशावर खेद व्यक्त केला

शेकडो वर्षांचे स्वप्न पुर्ण होत असताना राजगुरुनगर व परिसरातील मंदिरांमध्ये एका व्यक्तीच्या उपस्थितीत आज अयोध्येत भूमिपुजन सोहळा संपन्न होत असताना १० मिनिटे घंटानाद करण्यात येणार होता मात्र आज सकाळपासुनच राजगुरुनगर पोलीसांनी शासनाच्या आदेशानुसार राजगुरुनगर व परिसरातील सर्व मंदिरे बंद केली होती त्यामुळे कुठल्याच मंदिरात घंटानाद करण्यात आला नसून राम मंदिराच्या या भव्य भूमिपुजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करता न आल्याने भाजप व हुतात्मा राजगुरु स्मारक समितीच्या वतीने राज्य सरकारच्या आदेशाबाबत खेद व्यक्त करण्यात आला

अयोध्येत भुमिपुजन सोहळा संपन्न होत असताना राजगुरुनगर येथील मंदिरे बंद करण्यात आल्याने राजगुरुनगर शहरात घरात गुढी उभारुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: सुनिल थिगळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा