भारतात रुग्णसंख्या १९ लाखाच्या पार

नवी दिल्ली, ६ ऑगस्ट २०२०: भारतात कोरोना हा चांगलाच हातपाय पसरवताना दिसत आहे. ज्यामध्ये भारताच्या भवताली कोरोनाचा विळख्या घट्ट होताना दिसत आहे. ५ तारखेला संपुर्ण देशभरात अयोध्येच्या राम जन्म मंदिर भूमिपुजनाचा सोहळा दिवाळी सारखा पार पडत असताना कोरोनाने देखील भारतात ५२ हजार नव्या रुग्णांच्या स्वरूपात फटाके फोडले आहेत.

५ ऑगस्ट रोजी भारतात ५२,५०९ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ८५७ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्या मधे भारताने ५ ऑगस्टला कोरोना रुग्णांचा १९ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. भारतात सध्या ५,८६,२४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १२,८२,२१६ रुग्ण हे कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. ३९,७९५ रुग्ण हे कोरोनाचे बळी ठरले आहेत. तसेच गेल्या २४ तासांमधे झालेल्या रुग्ण वाढीमुळे देशातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या १९,०८,२५५ इतकी झाली आहे.

WHO ने दिला भारताला इशारा….

जागतिक आरोग्य संघटनेने भारताला इशारा देत भारतातील कोरोना परिस्थिती हि वाईट असून रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तर कोरोना आता भारताच्या ग्रामीण भागात देखील शिरकाव करु लागला आहे. त्याला वेळीच नाही आटोक्यात आणले नाही तर परिस्थती हि आणखी बिकट होणार असल्याचे WHO ने भारताला सांगितले आहे. तसेच भारतातील ग्रामीण भगात आरोग्य यंत्रणा फार तोकडी असून तिथे रुग्णांना योग्य ते उपचार मिळणार नसल्याची भिती देखील व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा