मुंबई, ६ ऑगस्ट २०२०: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील स्टार्सच्या आत्महत्येचा सिलसिला सुरूच आहे. टीव्ही अभिनेता समीर शर्माने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्याने मुंबईत आत्महत्या केली आहे. समीर शर्माने ‘क्योकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेत काम केले आहे.
बुधवारी रात्री समीर शर्मा (वय ४४) यांनी मलाड पश्चिमेकडील नेहा सीएचएस इमारतीत राहत्या घरी गळफास लावला. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने यावर्षी फेब्रुवारीमध्ये हे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. रात्रीच्या ड्युटी दरम्यान वॉचमनला समीर शर्माचा मृतदेह लटकलेला दिसला.
कोण होते समीर शर्मा?
समीर शर्माने बर्याच टेलिव्हिजन शोमध्ये काम केले. कहानी घर घर की कीशिवाय ते क्योंकि सास भी कभी बहू थी, रिश्ते हैं प्यार के, लेफ्ट राइट लेफ्ट, ज्योति, गीत हुई सबसे पराई, २६१२, दिल क्या चाहता है, वीरानगली, वो रहने वाली महलों की, आयुष्मान भव, इस प्यार को क्या नाम दूं? एक बार फिर, या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केली होती. सध्या ते ‘ये रिश्ता है प्यार के’ या मालिकेत सौर्य माहेश्वरीची भूमिका साकारत होते.
समीर यांची पदार्पण फिल्म हसी तो फसी ही होती. ते इत्तेफाक चित्रपटातही दिसले होते. समीरने बर्याच जाहिराती आणि मॉडेलिंग असाईनमेंटमध्ये काम केले. ते दिल्लीचा रहिवासी होते. शिक्षण संपल्यानंतर ते बंगळुरू येथे शिफ्ट झाले. त्याने तेथील अॅड एजन्सीमध्ये काम केले. त्यानंतर त्याने मुंबईत अभिनय करण्याचे स्वप्न साकार केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी