बारामती, ६ ऑगस्ट २०२० : बारामती शहरातील कोरोना संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने शासनाने खाजगी ११४ व २८ आय.सी.यु स्पेशालिस्ट डॉक्टर, कोविड केअर सेंटर येथे अधिग्रहित करण्यात आले आहेत. या डॉक्टरांनी कोणताही हलगर्जीपणा न करता कोरोना संसर्गाच्या रुग्णांवार इलाज करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
बारामती शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाने कोविड केअर सेंटरवर खाजगी डॉक्टरांना सहा तासाची चक्राकार ड्युटी करणे बंधनकारक आहे. याबाबत जर कोणी खाजगी डॉक्टरांनी याबाबत टाळाटाळ केली तर त्यांच्यावर मुंबई नर्सिंग ऍक्ट नुसार त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द होऊ शकते. वैद्यकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन रुग्णांवर इलाज करायचा आहे. खाजगी डॉक्टरांना प्रत्येकी सहा तासांची ड्युटी दिली आहे. तसेच खाजगी डॉक्टरांना रुई व सिल्व्हर जुबली हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेज येथे काम करावे लागते आहे.
खाजगी डॉक्टरांना शासनाने मानधन द्यावे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे तर येथे काम करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना कोरोना मध्ये पन्नास लाखाचे विमा कवच आहे. असे उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
खाजगी डॉक्टरांना शिफ्ट प्रमाणे चक्राकार ड्युटी करणे भाग आहे. बारामती तहसीलदार कार्यालयात वाररूम मध्ये कोविड १९ रुग्ण उपचार समिती नेमली आहे. यामध्ये कोविड रुग्ण असणाऱ्या परिसरातील माहिती घेतली जाणार आहे.तसेच कोविड रुगण असलेल्या ठिकाणी बारामती नगर परिषद, पंचायत समिती, सिल्व्हर जुबली रुग्णालय यांच्या कडे कोविड बाबतीच्या तक्रारी, कोरोना रुग्ण असलेल्या कंटेन्मेंट झोन ठिकाणी पाच टीम करून शंभर टक्के तेथील सर्व्हे करायचा. यामध्ये नागरिकांचं ऑक्सिजन, ताप, खोकला याची तपासणी करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव.