एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून हत्या

12

नाशिक, ७ ऑगस्ट २०२०: एकाच कुटुंबातील चार जणांचा गळा चिरून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार नांदगाव तालुक्यात घडला आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्हा हादरला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण कुटुंबियातील पती पत्नी व दोन मुलांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

सदर हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली तसेच मारेकरी कोण आहे याबाबत कोणताही तपास लागलेला नाही. चव्हाण कुटुंबीय आपल्या मळ्यातील घरातल्या ओसरीत झोपले होते. रात्री त्यांची निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली. चौघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर ही घटना समोर आली. समाधान आण्णा चव्हाण(३७) भरताबाई चव्हाण (३२) गणेश समाधान (६)आरोही समाधान चव्हाण(४) अशी या मृत्यू झालेल्या चव्हाण कुटुंबियातील सदस्यांची नावे आहेत.

पहाटेच रिक्षा चालक समाधान चव्हाण त्याची पत्नी मुलगा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, पोलीस घटनास्थळी पोहचले असून याचा अधिक तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी