अयोध्या, ९ ऑगस्ट २०२०: एकिकडे ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राममंदिर भूमिपुजन मोठ्या उत्साहात पार पडले. तर सुप्रीम कोर्टाच्या निकाला प्रमाणे सुन्नी वक्फ बोर्ड यांना देखील मशिद बांधण्यासाठी ५ एकर जागा देण्यात आली आहे.आणि त्याच जागेवर सुन्नी वक्फ बोर्डाचा आता निर्णय समोर आला आहे.
सुन्नी वक्फ बोर्ड त्यांना दिलेल्या ५ एकर मध्ये मशिद बांधणार नसून तिथे आता रुग्णालय, ग्रंथालय, सामुदायिक स्वयंपाकघर आणि रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. या सर्व बाबी जनतेच्या सुविधेसाठी असतील असे सांगण्यात येत आहे. तर या जागे विषयी सुन्नी वक्फ बोर्डाने असा सुस्तीयोग्य निर्णय घेतला आहे. तसेच याच्या शिलान्यास करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना अंमत्रित करणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
योगींनी यावर दिले स्पष्टीकरण…..
बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका खासगी वृत्त माध्यमाशी बोलताना याबाबत वक्तव्य केलं होतं, अयोध्येतील मंदिराच्या शिलान्यासानंतर सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेल्या जमिनीवर मशिदीच्या शिलान्यासाठी जाणार का याबाबत पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला होता. यावर ते “मला बोलवणार नाही म्हणून मी जाणार नाही”, अशी प्रतिक्रिया दिली होती.
अनेक स्तरावरुन बोर्डाचे कौतुक…..
‘इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ ट्रस्टचे सचिव आणि प्रवक्ता अतहर हुसैन यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. तसेच सुन्नी वक्फ बोर्डाच्या या निर्णयामुळे अनेकांकडून त्यांचे अनेक स्तरावरुन कौतुक केलं जात असून. राममंदिराची उभारणी करण्यापूर्वी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून येथे लोकोपयोगी वास्तू उभारण्याबाबत प्रतिक्रिया दिली जात होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी