नाशिक: केवळ ६३ जागांसाठी नाशिक मध्ये जवळपास तीस हजार तरुण जमा झाले आहे. प्रशासनाकडून यांची कोणतीही सोय न केल्यामुळे या तरुणांना रोडवर राहण्याची व झोपण्याची वेळ आली आहे. नाशिकच्या देवळाली कॅप मधील हा धक्कादायक प्रकार आहे. या सगळ्यामुळे येथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. गर्दी नियंत्रणासाठी स्थानिक पोलीस होमगार्ड असतानाही चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती.पहाटे चार वाजता सुरू होणारी भरतीप्रक्रिया रात्री दीड वाजल्यापासूनच सुरू करण्यात आली होती.
देशातल्या राज्यांमधून या लष्कराच्या भरतीसाठी तरूण जमा झाले आहेत. ३० ऑक्टोबर पासून सुरू होणारी ही भरती पाच तारखेपर्यंत चालू राहणार आहे.एका बाजूला देशात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे आणि हे तरुण लष्कर भरतीसाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहेत.