काँग्रेसचे प्रवक्ता राजीव त्यागीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन 

9

नवी दिल्ली, दि. १२ ऑगस्ट २०२०: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि प्रवक्ता यांचं बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. काँग्रेस पक्षाचे सचिव डॉ. विनीत पूनिया यांनी त्यांच्या निधनाबाबतची माहिती दिली आहे.
      
राजीव त्यागी हे नेहमीच वृत्त वाहिन्यांच्या चर्चेत सहभागी होत असत आणि आपल्या पक्षाची बाजू मांडत असत. मृत्यूपूर्वी त्यांनी आजतक या वृत्त वाहिनीच्या एका चर्चासत्रात भाग घेऊन आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडली होती. त्यांच्या अचानक जाण्यानं काँग्रेस पक्षात शोककळा पसरली आहे. 

 

काँग्रेसची श्रद्धांजली:

काँग्रेस पक्षाने ट्विट करून त्यांना श्रद्धांजली देत लिहिलं कि, ”राजीव त्यागींच्या आकस्मित निधनाने आम्हाला मोठं दुःख झालंय. ते कट्टर काँग्रेसी आणि देशभक्त होते.”

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची श्रद्धांजली:

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. कॉंग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल म्हणाले की, ”आपल्या कुटुंबातील एक सदस्य  गमावला आहे. हे त्याचे जाण्याचे वय नव्हते. बिहारचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रेमचंद्र मिश्रा म्हणाले, “माझा मित्र सहकारी काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. अकाली मृत्यूच्या बातमीने हादरलो आहे … ॐ शांती. “

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रांची श्रद्धांजली:

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ”माझा मित्र कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी आमच्या बरोबर राहिले नाहीत यावर विश्वास ठेवू शकत नाही. आज पाच वाजता आम्ही दोघांनी एकत्र वादविवाद केला. जीवन खूप अनिश्चित आहे … अद्याप शब्द सापडत नाहीत. हे गोविंद…  राजीवजींना आपल्या श्री चरणात स्थान द्या. “

राजीव त्यागी यांचा जन्म २० जून १९७० रोजी झाला होता. राजीव त्यागी यांच्या ट्विटर हँडलवर नजर टाकली तर ते संध्याकाळपर्यंत अगदी ठीक होते. त्यांनी दुपारी ०३ वाजून ४१ मिनिटांनी ट्वीट केले होते आणि सांगितले होते की, आज संध्याकाळी ५ वाजता मी आजतकच्या चर्चेत सहभागी होणार आहे. मात्र त्यानंतर त्यांचे दुर्दैवी निधन झाले. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा