सुशांतच्या आत्महत्याचे “या” रिपोर्टने ही दिले स्पष्टीकरण

मुंबई, १३ ऑगस्ट २०२०: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकरणाचे रणांगण तापलेले तर आहचे परंतू आता या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कलिना फॉरेन्सिक लॅबमधून टॉक्सिकोलॉजी, सायबर, लिजीचर मार्क, नेल सॅम्पलिंग, स्टमक वॉश हे अहवाल देखील समोर आले आहेत.

नेल सॅम्पलिंग अहवालामध्ये कोणत्याही इतर झटापटीच्या खुणा नाहीत. अहवालानुसार त्याच्या शरीरावर आढळलेले पांढरे डाग त्यांच्या थुंकीचे आहेत, जे मृत्यूनंतर तोंडातून बाहेर आले होते. त्यानंतर ते कपड्यांवरच वाळल्यामुळे तिथे पांढरे डाग तयार झाले होते. या अहवालानुसार त्याच्यावर कोणतेही स्ट्रगल मार्क नाहीत. स्टमक वॉशचा अहवाल असे दिसते की, सुशांतला कोणतेही विष किंवा विषारी गोष्ट देण्यात आली नव्हती. त्याचे पोट देखील क्लिअर होते. लीजिचर मार्कमध्ये देखील कोणतेही झटापटीचे किंवा जखम असणाऱ्या खुणा सापडल्या नाही आहेत.

विसारा रिपोर्टनुसार सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या होते. हा फॉरेन्सिक अहवाल मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा