आता कमी किंमतीत विना बॅटरीसह घेता येणार इलेक्ट्रॉनिक गाड्या

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट २०२०: आता आपण बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची देखील खरेदी करू शकता. किंबहुना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अशा इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री व नोंदणीस परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण किंमतीपैकी ३० ते ४० टक्के किंमत बॅटरीची असते.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन सचिवांना पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, चाचणी संस्थेने जारी केलेल्या मान्यता प्रमाणपत्राच्या आधारे बॅटरीशिवाय वाहनांची विक्री आणि नोंदणी करता येईल. तसेच नोंदणीसाठी मेक / टाईप किंवा बॅटरीचे इतर कोणतेही नमूद करण्याची आवश्यकता नाही. मात्र, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ च्या नियम १२६ अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या चाचणी एजन्सीद्वारे इलेक्ट्रिकल वाहनाचा प्रोटोटाईप आणि बॅटरी (नियमित बॅटरी किंवा स्वॅप करण्यायोग्य बॅटरी) च्या वापराला मान्यता मिळणे आवश्यक आहे.

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम नियम ,१९८९ अंतर्गत संबंधित फॉर्मस कडे राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे लक्ष वेधले गेले आहे. उदा. (मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी अर्ज) वाहने इंजिन क्रमांक / मोटर क्रमांक (बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या बाबतीत) नियम ४७ अंतर्गत मोटार वाहन नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म – २१ (विक्री प्रमाणपत्र), फॉर्म -२२ (उत्पादकाने दिलेले रस्ता योग्यता प्रमाणपत्र) आणि फॉर्म -२२-A (मोटार वाहनांसाठी दिलेला रस्ता योग्यता प्रमाणपत्र जिथे गाड्यांची जुळवाजुळव स्वतंत्रपणे केली जाते)

देशातील विद्युत गतिशीलता वाढवण्यासाठी सरकार परिसंस्था तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. वाहनांचे प्रदूषण आणि तेल आयात खर्च कमी करण्यासाठी व्यापक राष्ट्रीय कार्यक्रम साध्य करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची वेळ आली आहे. यामुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण होणार आणि आयात खर्च कमी होणार नाही तर उदयोन्मुख उद्योगांना संधी देखील उपलब्ध होतील.

इलेक्ट्रिकल दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या प्रोत्साहनासाठी बॅटरीची किंमत (जी एकूण खर्चाच्या ३०-४०% इतकी असते) वाहनांच्या किंमतीतून वगळण्यासंबंधित शिफारशी मंत्रालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या आहेत. त्यानंतर त्या बॅटरीशिवायही बाजारात विक्री करता येईल. यामुळे इलेक्ट्रिकल टू व्हीलर (२W) आणि ३ व्हीलर (३W) ची किंमत आयसीई २ आणि ३W पेक्षा कमी होईल. बॅटरी OEM किंवा उर्जा सेवा पुरवठादाराकडून स्वतंत्रपणे पुरवली जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा