भारत पाच राफेल आणो किंवा पाचशे आम्ही तयार…

इस्लामाबाद, १४ ऑगस्ट २०२०: भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानामचा समावेश केल्यापासून पाकिस्तानची अस्वस्थता वाढली आहे. गुरुवारी पाकिस्तानी लष्कराने राफेलचा पुन्हा एकदा उल्लेख करत भारताच्या सैन्य खर्चातील वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. पाकिस्तान भारत लष्कराचा खर्च आणि संरक्षण बजेटमधील वाढीबद्दल पाकिस्तानला चिंता असल्याचे पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते जनरल बाबर इफ्तीकर यांनी सांगितले. पण, फ्रान्सकडून भारताने पाच राफेल जेट खरेदी केली असले तरी पाकिस्तानी सैन्य कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याने गुरुवारी अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांबाबत बोलविलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आज पाकिस्तानही आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. भारताच्या राफेल खरेदीमुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या प्रश्नावर लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारताचा लष्करी खर्च जगात सर्वाधिक आहे आणि भारत शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सहभागी आहे.

इफ्तिकार म्हणाले, फ्रान्समधून भारतात आणल्या जाणाऱ्या राफेल विमानांचे ज्याप्रमाणे चित्रीकरण केले केले त्यावरून भारताची असुरक्षितता दिसून येते. भारताने पाच राफेल खरेदी करू किंवा ५००, याचा पाकिस्तान वर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही या सर्व गोष्टींसाठी तयार आहोत आणि आम्ही या आधी देखील हे सिद्ध केले आहे. भारताचे सुरक्षा बजेट आणि पाकिस्तानचे सुरक्षा बजेट यामधील तफावत ही या क्षेत्रामध्ये तणाव निर्माण करणारी आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

पाकिस्तान सैन्याच्या प्रवक्त्याने हे देखील मान्य केले की पाकिस्तानचे सैन्य बजेट कमी आहे. ते म्हणले की, पाकिस्तानमध्ये अनेक लोक म्हणत आहेत की सुरक्षा बजेट हे जास्त आहे. सध्या अर्थसंकल्पातील १७ टक्के रक्कम सेना, नौदल आणि हवाई दलासह सैन्यावर खर्च केली जाते. गेल्या १० वर्षात पाकिस्तानचे संरक्षण बजेट सातत्याने कमी होत आहे. गेल्या दोन वर्षांत संरक्षण अर्थसंकल्पातही महागाईच्या दरानुसार वाढ झाली नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की त्याचा आपल्या तयारीवर परिणाम झाला आहे. कमी स्त्रोत असूनही आपल्या शत्रूंचा सामना करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा