विशाखापट्टणम,१४ ऑगस्ट २०२० : संपत्तीच्या वादातून वडिलांनी आपल्याच मुलाची निर्घृणपणे हत्या केली असल्याचे समोर आले आहे. आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणममध्ये या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून. गुन्हा केल्यावर आरोपीने स्वत: पोलीस स्टेशनला दाखल होत आत्मसमर्पण केले.
माहितीनुसार आरोपीचे नाव वीरा राजू असे आहे. सीसीटिव्ही व्हिडीओत हे स्पष्ट दिसत आहे की मृतक जलाराजू घराच्या व्हरांड्यात बसला होता.त्याचवेळी वीरा राजूने मागून येऊन त्याच्या डोक्यावर हातोडानं हल्ला केला. निर्दयी वडिलांनी मुलाच्या डोक्यावर अनेक वार केले. डोक्याला दुखापत झाल्याने जलाराजूचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, वडील आणि मुलगा यांच्यात संपत्तीवरून वाद होता.वादानंतर वीरा राजूने त्याचा मुलगा जलाराजूवर हातोडीने वार केला. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहचला आणि त्याने आत्मसमर्पण केले. आरोपीविरूद्ध खुनाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या अधिक तपास पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी