पुरंदर, दि. १४ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीसमोर आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी गावातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी उपोषण केले. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस यांच्या मध्यस्थीने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून संबंधित वराह पालकांना १९ तारखेपर्यंत डुकरांची सोय करण्यासंदर्भात मुदत दिली आहे.
नीरा येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने उपोषण करण्यात आले होते. नीरा शहरात मोकाट असलेल्या डूकरांमुळे डुकराच्या मालकांच्या आरेरावीमुळे नागरिक ग्रामस्थ त्रस्त झाले होते. अनेक वर्ष नीरा ग्रामपंचायतिला या डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदने देण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत होते. त्याचबरोबर संबंधित डुकरांच्या मालकांकडून सुद्धा योग्य ती दखल न घेता गावात मुकाटपणे डुकरे सोडून देण्यात येत होती. त्यामुळे निरा शहरातील दुचाकीस्वारांचे अनेक वेळा अपघात झाले होते. त्याचबरोबर डुकरे त्यांना खाद्य न मिळाल्यास लहान मुलांच्या हातातील.
तसेच बाजारकरूंच्या पिशव्या पळवत होती. त्यातच वराह पालकांच्यात असलेल्या भांडणामुळे ते एकमेकाची डुकरे मारत होती त्यामळे नदीकाठी व शहरात दुर्गंधी पसरत होती. संबंधितांना याबाबत सांगितले असता हा आमचा पारंपरिक व्यवसाय असून आमचे पोट याच्यावरच चालते आम्हाला जागा द्या. आम्ही डुकरे तिकडे नेहतो असे सांगितले जात होते. त्यांच्या या आडमुठेपणामुळे आज लोकांना ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसावे लागले. यावेळी अध्यक्ष सुभाष जेधे यांचे समवेत टी के.जगताप. नंदकुमार शिंदे, हे उपोषणाला बसले होते. यावेळी संघटनेचे प्रमोद डांगे,मिलिंद कोंडे, भरत गायकवाड, तुळशीराम जगताप रुपेश काकडे जयदीप काकडू आदी उपस्थित होते.
दरम्यान ग्रामपंचायतीने आज सकाळ पासूनच ही डुकरे पकडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. एक टेम्पो भरल्यानंतर डुकराच्या मालकांनी ग्रामपंचायतीकडे धाव घेतली व आम्हाला थोडी मुदत द्या आम्ही त्याची व्यवस्था करतो अशी विनंती केली. यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश माने, माजी सरपंच राजेश काकडे उपसरपंच बाळासाहेब भोसले, सदस्य अनिल चव्हाण यांनी मध्यस्थी करीत उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. संबंधितांना १९ तारखेपर्यंत मुदत देत हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी