सातारा, १५ ऑगस्ट २०२०: स्वतंत्र दिनाच्या दिवशी सातारा व कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना बँकेचा हप्त्यावरून तसेच जमिनीच्या वादावरून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर शहरातील उपनगरात राहणाऱ्या एका कुटुंबाने जमिनीच्या वादावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जमिनीच्या वादावरून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित होते. याबाबत या कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयात देखील वारंवार तक्रार नोंदवली होती. याचबरोबर पोलीस प्रशासनाकडे देखील या कुटुंबाने वारंवार तक्रार केली होती. मात्र, याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नव्हती. त्यामुळे या कुटुंबाने संताप व्यक्त करत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री सतीश पाटील जिल्हाधिकारी कार्यालयास दाखल झाले होते. सतीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण आटोपल्यानंतर या कुटुंबांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अगदी कुटुंबातील लहान मुलांपासून ते सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमा झाले व स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घटनास्थळी अग्निशामक दल उपस्थित असल्याने होणारी संभाव्य घटना टळली. सध्या पोलिसांनी या कुटुंबाला ताब्यात घेतले आहे.
साताऱ्यात आत्मदहनाचा प्रयत्न
याचबरोबर आज आणखीन एक आत्मज्ञानाची घटना समोर आली आहे. ही घटना साताऱ्यातील आहे. बँकेचा हत्यांवरून एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. जावळी बँकेच्या संदर्भात हे प्रकरण आहे. बँकेचे हप्ते भरले असून सुद्धा बँक त्याची मागणी करत असल्याची तक्रार या कुटुंबाने केली आहे.
सध्या पोलिसांनी या कुटुंबाला ताब्यात घेतले आहे. या दरम्यान पोलिस आणि आंदोलन करते यांच्यामध्ये झटापट झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न हे कुटुंब करत होते. परंतु, घटनास्थळी पोलिस उपस्थित असल्यामुळे होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. विशाल नलावडे व राहुल नलावडे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अशा या कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
या कुटुंबाने जावळी बँकेतून कर्ज घेतले होते. या कर्जाचा हप्ता ते सातत्याने वेळेत भरत होते. परंतु, बँकेच्या व्यवस्थापन मंडळाने त्यांना सांगितले की तुमच्या कर्जाची रक्कम थकीत आहे व तुम्हाला पूर्ण रक्कम पुन्हा भरावी लागेल. याबाबत या कुटुंबाने अशी सूचना देखील दिली होती की, आत्मदहन करून आंदोलन केले जाईल. परंतु, बँकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी आज सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी