बीड, १६ ऑगस्ट २०२०: नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया आणि स्वदेशी सारख्या संकल्पना जनतेसमोर मांडल्या. परंतू लॉक डाउनच्या काळामध्ये उद्योगधंद्यांना चांगलाच फटका बसलेला दिसला. त्यातही अशा परिस्थितीत स्टार्टअप उभारणे म्हणजे जोखमीचे काम. या काळात मोठे उद्योगधंदे देखील ठप्प झाले, अनेक कंपन्या बंद झाल्या आणि अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या.
परंतु, या काळात देखील अनेक लोकांनी हार न मानता आणि उद्योग धंदे देखील वाढले आहेत. असेच एक उदाहरण बीडमध्ये बघण्यास मिळाले आहे. बीडच्या आष्टी गावातील सांगवी पाटण गावाचा रहिवासी असलेल्या दादासाहेब भगत या तरुणाने लॉकडाउन काळात आपल्या गावात संपूर्ण भारतीय बनावटीचे डिझायनिंग सॉफ्टवेअर बनवले आहे.
आज १५ ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्यदिन, या दिवसाचे औचित्य साधत दादासाहेब भगत या बीड मधील तरुणाने एका शेडमध्ये बनवलेले डू ग्राफिक्स सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे. डू ग्राफिक्स हे सॉफ्टवेअर त्याने एका पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत बनवले आहे. विशेष म्हणजे इन्फोसिस कंपनी मध्ये ऑफिस बॉयचे काम करता करता त्याला ग्राफिक्स विषयी माहिती झाली होती आणि तिथून प्रेरणा घेत त्याने एवढे मोठे यश साकारले.
दादासाहेबाने दहावीचे शिक्षण गावित येथून पूर्ण केले होते. दहावी पूर्ण झाल्यानंतर त्याने आयटीआय मध्ये प्रवेश घेतला. यानंतर त्याने अकरावीमध्ये प्रवेश घेतला परंतु काही अडचणीमुळे तो त्याचे ११ वी चे शिक्षण पूर्ण करू शकला नाही. दहावी पास व आयटीआय आणि अकरावीमध्ये ही यश न आल्यामुळे त्याने गाव सोडले व नोकरीसाठी पुण्यामध्ये आला.
पुण्यामध्ये आल्यानंतर त्यानी इन्फोसिस कंपनी मध्ये ऑफिस बॉयचे काम केले. इन्फोसिस मध्ये त्याने जवळपास एक वर्ष काम केले. हे काम करत असताना त्याला ॲनिमेशनची माहिती मिळाली . नंतर त्याने मोशन ॲनिमेशन वर ऑनलाईन धडे घेण्यास सुरुवात केली. हे शिक्षण घेत असताना कधी आपल्या मित्रांची मदत घेतली तर कधी ऑनलाइन शिक्षणची. हे करत असतानाच त्याने पुण्यामध्ये आपले काम सुरु केले. हे करत असतानाच दादासाहेबांनी आपली कंपनी चालू केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी