पुणे बनलं कोरोनाची राजधानी..

5

पुणे, १७ ऑगस्ट २०२०: देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सध्या भारताचा जगातील कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्ये बाबतीत पहिल्या तीन देशांमध्ये समावेश झाला आहे. त्यात महाराष्ट्र हे देशातील हॉटस्पॉट ठरलं आहे. यात महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही कोरोनाची राजधानी ठरली होती. पण आता मुंबईला ही मागे टाकत शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी मानलं जाणारे पुणे शहर आता कोरोनाची राजधानी बनलं आहे.

रविवारी राज्याच्या अहवालानुसार पुणे जिल्ह्याने मुंबईला मागे टाकत १ लाख ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एकूण १०१० कोरोना प्रकरणांची नोंद झाली होती. या व्यतिरिक्त, उपचारादरम्यान ४७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ७१९ जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले होते. मुंबईत आतापर्यंत एकूण १ लाख २८ हजार ७५६ कोविड प्रकरणे सापडली होती. त्याचबरोबर काल पुण्यात ३,२०० नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यासह पुण्याची आकडेवारी १.३ इतकी झाली जी मुंबई पेक्षा जास्त आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने दक्षिण अफ्रिकेलाही मागे टाकले असून या देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५,९५,८६५ इतकी आहे. जागतीक आकडेवारीनुसार, दक्षिण अफ्रिकेचा पाचवा क्रमांक लागतो. याबाबत अमेरिका (५५,६६,६३२), ब्राझिल (३३,४०,१९७), भारत (२६,४७,३१६) आणि रशिया (९,२२,८५३) हे देश दक्षिण अफ्रिकेच्या पुढे आहेत. दरम्यान, मुंबई शहर हे अद्यापही करोनाबाधितांच्या मृत्यू प्रमाणात आघाडीवर आहे. टाइम्स नाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा