नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२०: आज सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणाच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार सीबीआयला दिले आहेत. सुशांतचे कुटुंबीय आणि त्यांचे चाहते बरेच दिवसांपासून सीबीआय चौकशीची मागणी करत होते. बिहारमध्ये नोंदविण्यात आलेली एफआयआर सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. तसेच, मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोर्टाने सांगितले की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाविषयी कारवाई केली नव्हती तर फक्त चौकशी केली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सीबीआयकडे सर्व कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकते.
बिहारचे डीजीपी म्हणाले- अन्यायाविरूद्ध विजय
सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपविल्याबद्दल बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी मुंबई पोलिसांच्या चौकशीवर आणि त्यांच्या बिहार मधील अधिकाऱ्यांना अलग ठेवण्याची चौकशी केली. त्यांनी माध्यमांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सिद्ध झाले की, बिहार पोलिसांनी काहीही चूक केली नाही. हा अन्यायाविरूद्ध विजय आहे. आमचा विश्वास आहे की सुशांतला न्याय मिळेल. आमच्यावर अनेक आरोप केले गेले. आम्हाला चौकशी करण्याची परवानगी नव्हती. पटना पोलिस कायदेशीररीत्या सर्व काही करत होते. बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर भाष्य करण्याची योग्यता रिया कडे नाही.
कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतच्या भावाने काय म्हटले?
सुशांतचा चुलत भाऊ नीरजसिंग बबलू म्हणाला- हा निर्णय आमच्या कुटुंबातील आणि देशातील कोट्यावधी लोकांसाठी आला आहे. सीबीआय चौकशीला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आता आम्हाला खात्री आहे की सुशांतसिंग राजपूतला नक्कीच न्याय मिळेल.
सुशांतचे वकील म्हणले – आता न्याय मिळेल
सुशांतसिंग राजपूत यांचे कौटुंबिक वकील विकास सिंग म्हणाले – सुशांतच्या कुटूंबासाठी हा मोठा विजय आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कोणताही तपास केला नव्हता, असेही कोर्टाने कबूल केले. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. न्यायाच्या दिशेने ही पहिली आणि मोठी पायरी आहे. आता सीबीआय आपला तपास सुरू करेल आणि सुशांतच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूचे सत्य कळू शकेल. काल रियाने काढलेले निवेदन फक्त सहानुभूती मिळवण्यासाठीच केले गेले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी