कॅलिफोर्निया, १९ ऑगस्ट २०२० : अमेरिकेत नुकतेच एक आगीचं वादळ निदर्शनास आलं आहे. या मुळे जंगलांमध्ये आग लागली आहे. हे दृश्य फारच दुर्मिळ आहे. ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लोयल्टन भागातली आहे. यासाठी इतिहासातील प्रथमच अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसनं चेतावणी जारी केली आहे.
आगीचं तुफान म्हणजे काय? हे किती धोकादायक आहे? ते कसं तयार होतं?
आगीच्या या वादळाला फायर टोरनॅडो असे देखील संबोधलं जातं. आज काल याला फायरनाईंडो असं देखील बोललं जातं. जेव्हा एखाद वादळ आग, उष्णता आणि धुर आपल्यामध्ये खेचून घेतं तेव्हा फायर टोरनॅडो तयार होतं. हे बघून असा भास होतो की, जणू जमिनीतून आग ओकणारी एक रेश आकाशाच्या दिशेनं वर जात आहे. हे दृश्य अत्यंत दुर्मिळ आहे. असं वादळ खूप कमी पणाण्यास मुळतं. उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेली आग हे फायर टोरनॅडो बनण्याचं मुख्य कारण आहे.
हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अतिशय तीव्र हवामानात आगीचे वादळ दिसून येतं. ते पूर्णपणे आगीनं भरलेलं आहे. जे काही त्याच्या मार्गाने येतं ते पूर्णपणे खक होतं. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाला सामोरे जाणे देखील अवघड होते.
जर अग्निच्या वादळासाठी योग्य हवामान झालं तर ते आकाशात ३० हजार फूटांपर्यंत जाऊ शकतं. यावेळी वारा ताशी १७७ किलोमीटर वेगाने असतो, तो बर्याच वेळा वाढून २७० किलोमीटरपर्यंत जातो. दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कॅलिफोर्नियामध्येच असं वादळ दिसलं होतं. त्यानंतर त्यानं ताशी २५५ किलोमीटर वेगाने प्रवास केला.
सन २०२० मध्ये आतापर्यंत लोयल्टन मधील २० हजार एकर जंगल भस्मसात झाले आहे. या भीषण आग, तपमान आणि हवेच्या तीव्र गतीमुळे या वादळाचा जन्म झाला. फायर टॉर्नेडोला फायर स्विरल आणि फायर ट्विस्टर म्हणूनही ओळखले जातं. त्याचे तापमान १०९० डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी