हवामान: यावर्षी पाऊस चांगलाच लांबणीवर गेला असल्याकारणाने राज्याच्या पावसाच्या सरासरीत चांगलीच वाढ झाली आहे. या अतिरिक्त पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर ओले संकट ओढावले आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये हे पिके पाण्याखाली गेली आहेत.
साधारणतः मान्सून भारतातून परतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरी ६९.८ मिलिलिटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा मान्सूनचे जाणे लांबले आहे. १६ ऑक्टोबरला जातच त्याची जागा मान्सून उत्तर पावसाने घेतली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ऑक्टोबरअखेर सरासरीपेक्षा १२५ टक्के अधिक हजेरी लावली राज्यात १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान १५७.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.या महिन्याच्या कालावधीत राज्यातील एकही जिल्हा यातून सुटला नाही.
नुकसानग्रस्त पिके:
खरीप पिके: कापूस, मका, सोयाबीन, भात, तूर बाजरी, कांदा भुईमग इत्यादी
फळ पिके: द्राक्ष डाळिंब अंजीर, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी इत्यादी
भाजीपाला पिके: टोमॅटो, पालेभाज्या इत्यादी