इच्छा तेथे मार्ग या म्हणीची प्रचिती देणारी स्वप्नाली सुतार

कणकवली, २१ ऑगस्ट २०२० : शिक्षणाची गंगा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी भगिरथ प्रयत्न करणाऱ्या कोकणातील कणकवलीच्या स्वप्नाली सुतारची संघर्षगाथा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. मोबइलला नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाइन लेक्चरला गैरहजेरी लागू नये, म्हणून घरापासून २५ मिनिटे लांब असलेल्या निर्मनुष्य डोंगरावर ती सध्या झोपडी बांधून अभ्यास करत आहे.

स्वप्नाली सुतार मूळची कणकवली तालुक्यातील दारिस्ते (सुतारवाडी) गावची. मुंबईतील गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी मुंबईत दिवा येथे आपला भाऊ सचिन मेस्त्री याच्याकडे ती राहत होती. लॉकडाउनमुळे कॉलेज बंद असल्याने ती गावी परतली. यादरम्यान लॉकडाऊन वाढतच गेल्याने कॉलेजने ऑनलाइन लेक्चर्स सुरू केले. पण, तिच्या गावी मोबाइलवर बोलायलाही रेंजपण मिळत नव्हती तर तिथे इंटरनेट सुविधा मिळणे दर दूरच.

आजही कोकणातील अनेक गावांमध्ये ही अडचण दिसून येते. नेटवर्कअभावी कॉलेजचे ऑनलाइन लेक्चर बुडण्याची चिंता स्वप्नालीला सतावत होती. त्यामुळे गावाजवळील डोंगरभागात कुठे नेटवर्क मिळते का, याची चाचपणी तिने सुरू केली. तेव्हा जवळच्या डोंगरावर आंब्याचा माळ येथे तील चांगले नेटवर्क मिळत असल्याचे लक्षात आले. पण, ऐन पावसाळा सुरू असताना अभ्यास करायचा कसा, हा नवा प्रश्न उभा राहिला. तरीही पावसाची पर्वा न करता छत्रीचा आधार घेत तिने लेक्चर्सना हजेरी लावली. आपल्या बहिणीची अभ्यासासाठीची ही तळमळ पाहून कुटुंबीयांची परवानगी घेत तिच्या भावाने तिला डोंगरावर छोटीशी झोपडी बांधून दिली. तेव्हापासून सकाळी ७ ते ६ वाजेपर्यंत अभ्यास, लेक्चरला उपस्थिती, व प्रॅक्टिकल आटपून घर गाठणे, असा स्वप्नालीचा दिनक्रम सुरू आहे.

तिचा हा ‘शिक्षणसंघर्ष’तिच्या शालेय शिक्षिकेने पुढे आणण्याचा प्रयत्न केला. ही संघर्षगाथा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कॉलेजपर्यंत पोहोचली. कॉलेजकडून तिला मुंबईतील हॉस्टेलमध्ये येऊन राहण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. मात्र, हॉस्टेलची ५० हजार रुपये इतकी फी आवाक्याबाहेर असल्याने ती तिथे रहायला जाण्यास असमर्थ होती.

परंतू आता तीची हि आडचण ही दूर होणार आहे. कारण आमदार नितेश राणे यांनी तीच्या घरच्यांशी बोलून तीला ५०,००० हजार रूपयांची मदत केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा