मोठी बातमी: भारत-चीन सैन्यामध्ये पुन्हा एकदा झडप…

लडाख, ३१ ऑगस्ट २०२०: गलवान खोर्‍यातील हिंसक झडपेनंतर भारत आणि चीन मधील संबंध गेल्या अनेक दशकांनंतर पुन्हा खराब झाले आहेत. यानंतर आर्थिक मोर्चा पासून ते राजनैतिक मोर्चेबांधणी पर्यंत भारत सरकारने निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. अशी परिस्थिती असतानाच आता चीनने पुन्हा एकदा संबंध खराब होतील असे कृत्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार २९ ऑगस्ट आणि ३० ऑगस्ट रोजी भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यांमध्ये पुन्हा एकदा झडप झाली आहे.

चीनच्या या घुसखोरीमुळे आता परिस्थिती आणखीनच नाजूक बनत चालली आहे. असंही सांगितलं जात आहे की आता लिमिटेड वॉर देखील होऊ शकते. २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री ही नवीन झडप झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी झालेली ही झडप पेंगोंगच्या दक्षिण भागात झाली आहे. या घटनेनंतर श्रीनगर लेह हायवे सामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. केवळ सुरक्षा दलांसाठी हाय-वे सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या आधी चीन सोबत झालेली ही झडप पेंगोंग शोच्या उत्तर भागामध्ये झाली होती. आणि, या वेळेस ही झडप पेंगोंग शोच्या दक्षिण भागात झाली आहे. सदर भाग हा लडाख मधील फोर्टीन कोर्स भाग आहे. भारतीय सैन्य या भागात आधीपासूनच सतर्क होते. त्यामुळे या वेळेची ही घुसखोरी ताबडतोब रोखण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा