मुंबई, ३१ ऑगस्ट २०२० : हिंदी चित्रपट निर्माते, कलाकार तसंच मल्टीप्लेक्स असोसिएशननं चित्रपटगृहं सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. गेल्या महिन्यात संघटनेनं कोविड नियमावलीचं पालन करत चित्रपटगृहं सुरू करण्याची प्रमाणीत कार्यपद्धती केंद्र सरकारची काही मंत्रालयं, पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोगाला सादर केली आहे.
विमानप्रवास, मेट्रो, मॉल्स, रेस्टॉरंट सुरू होणार असतील तर चित्रपटगृहांनाही संधी मिळायला हवी असं मल्टीप्लेक्स संघटनेनं ट्विटर संदेशात म्हटलं आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही चित्रपटगृहं सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी