माझं ३ लाख बिल कमी केलं पण नागरिकांचे ३०० रू. सुद्धा नाही; आमदाराचा घणाघाती आरोप

डोंबिवली, १ सप्टेंबर २०२०: कल्याण डोंबिवलीतील वीज महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी चव्हाट्यावर आणला आहे. या कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपन्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना वापरापेक्षा जास्त बिल हे आकारले गेले होते. त्यामुळे अवाजवी बिलामुळे नागरिकांनी संतापून वीज महावितरण कार्यालयावर मोर्चा आणला होता मात्र तेव्हा नागरिकांची समजूत घालण्यात आली.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या ५ लाखांच्या बिलातून ३ लाख बिल कमी करण्यात आले. मात्र जेव्हा सर्वसामान्य नागरिकांचे वीजबिल करण्याची वेळ येते तेव्हा पेपर आणि कॅल्सी दाखवली जातात. त्यामुळे वीज महावितरण कार्यालयातील भेदभाव समोर आल्याचे कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. माझ्या वीजबीलातून 3 लाख रुपये कमी करण्यात आले, मात्र जेव्हा सामान्य नागरिक वीजबील कमी करण्यासाठी जातात तेव्हा त्यांचे ३०० रूपये सुद्धा कमी केले जात नाहीत अशी टीका आमदारांनी केली आहे.

गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाचे महावितरणाने तब्बल 5 लाख रुपयांचे विजबील पाठवले. त्यामुळे त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना महावितरण कार्यालयात चौकशीसाठी पाठवले असता अधिकाऱ्यांनी बिलातून तब्बल 3 लाख रुपये कमी केले. त्यामुळे नेता आणि सामान्य नागरिक यांच्यात एवढा भेद का? असा प्रश्न आमदार गणपत गायकवाड यांनी विचारला आहे. यावर आता महावितरणाचे अधिकारी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाच ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा