राफेलला उडणाऱ्या पक्ष्यांपासून धोका…! तळाजवळ कबुतरे उडवल्यास कारवाई

हरियाणा, २ सप्टेंबर २०२०: अंबाला एअरबेसमध्ये तैनात लढाऊ विमान राफेलच्या सुरक्षेच्या दृष्टीने एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांनी हरियाणाच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहिले आहे. एअर मार्शल यांनी पत्रात अंबाला एअरबेसवर तैनात राफेल विमानांना येथील उडणाऱ्या पक्ष्यांपासून धोका असल्याचे सांगितले तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

एअर मार्शलच्या पत्रानंतर नागरी संस्था संचालनालयाने हवाई दलाच्या तळाभोवती दहा किमीच्या परिघात कबूतर उडविणाऱ्या लोकांना नोटिसा बजावल्या आहेत आणि कबूतर उडल्यास कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. विशेष म्हणजे फ्रान्समधील पाच राफेल विमाने अंबाला एअरबेसवर तैनात करण्यात आली आहेत.

यापूर्वी हरियाणाच्या अंबाला येथे अधिकाऱ्यांना भारतीय हवाई दल स्टेशन उडवून देण्याचे धमकीदायक पत्र मिळाले होते. इथेच पाच राफेल विमानांची पहिली खेप तैनात आहे. शुक्रवारी पोलिसांना हे पत्र मिळाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा