भाजप- शिवसेना यांच्यामधील तिढा लवकरच सुटणार असून येत्या ६ तारखेला हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार स्थापन करतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात येत आहे.
तसेच शिवसेनेला महत्वाची पदे देण्यास भाजपकडून देण्यात आली असल्याचे समजते आहे. केंद्रात आणि राज्यात अशी दोन्ही ठिकाणी शिवसेनेला महत्वाची पदे देण्यात येणार आहेत.अशी माहिती आहे. त्यामुळे लवकरच स्थिर सरकार स्थापन होईल अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
विधानसभा निवडणुक निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर आडून आहे तर शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पदाची मागणी जोर धरू लागली आहे. पण या सर्वांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीअगोदरच जाहीर केले होते. की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील. त्यामुळे हा वाद निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
३१ ऑक्टोबर रोजी दुपारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेते पद देण्यात आले आणि ते निश्चित ही होते. परंतु बैठकीनंतर बाहेर पडलेले नेते कोणतेही वक्तव्य करण्यास तयार नव्हते. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे एकच वक्तव्य सर्व आमदारांचे होते. नेत्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्री पदाविषयी प्रश्न विचारला असता या प्रश्नावर सर्व आमदारांनी मौन बाळगले होते. मग असे म्हणायला वावगे ठरणार नाही की शिवसेनेला कदाचित मुख्यमंत्रीपद नकोय. याचे कारण असे की कमीतकमी त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे याला तरी समर्थन द्यायला हवे होते पण एकाही नेत्याकडून ठामपणे व स्पष्टपणे या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले नाही.
मग निकाल लागल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जो नाट्यमय प्रकार चालू आहे हा फक्त कार्यकर्त्यांना आणि जनतेला दाखवण्या पुरताच आहे का? एकूण घडामोडी पाहता कदाचित शिवसेनेने काही महत्त्वाची मंत्रिपदे मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात मागितली असावीत. शिवसेनेची केंद्रामध्ये महत्वाचे कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची मागणी असावी, तसेच महाराष्ट्र मध्ये गृहमंत्री पद, महसूल मंत्री पद इत्यादींसारखे महत्त्वाची पदे मागितली असावीत. सत्तास्थापनेसाठी काही दिवसांचा वेळ उरला आहे. सरकार महायुतीचेच येणार बाकी सर्व चर्चा व्यर्थ ठरणार आहेत का? तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो असा खेळ शिवसेना-भाजपमध्ये चालू आहे.