“घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही” – आदेश बांदेकर

मुंबई, ५ सप्टेंबर २०२०: कंगना रानौतने केेलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यावर महाराष्ट्र चांगलाच पेटल्याचे पहायला मिळाले. त्यातच तिच्या मुंबईला पाकव्याप्त विधानावर अनेक पक्ष हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. राजकीय नेते आणि मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी कंगनाला धारेवर धरले, तर अनेकांनी प्रदर्शने, घोषणाबाजी देऊन तिच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे भाऊजी आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी कंगनावर ताशेरे ओढले आहेत.
     

कंगनाच्या मुंबईला दिलेल्या पाकव्याप्तच्या उपमेनंतर झाशीच्या राणीचा चित्रपट केल्याचे तिने सांगितले. तर त्यावर शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी कंगनावर चांगलाच निशाणा साधत “खोट्या घोड्यावर बसत दुसऱ्यांनी पढवलेले स्क्रीप्ट वाचल्याने कोणी झाशीची राणी होत नाही. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते असा सणसणीत टोला लगावला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा