हडपसर, दि. ०६ सप्टेंबर २०२०: वृक्ष लागवडीसारखी वैधानिक कामे विविध सामाजिक संस्थांनी आयोजित केली पाहिजेत व प्रशासनाने पाऊल उचलण्याची आज गरज आहे. आपण पर्यावरणाविषयी जास्तीत जास्त जागरूकता कशी करू शकतो यावर अधिक लक्ष दिले पाहिजे.
कार्य अधिक चांगले करण्यासाठी इतर सामाजिक संस्थांनीही हातभार लावला तर हे काम नक्कीच खूप वेगाने पसरणार आहे. ही कल्पना गंगा तारा सोशल फाउंडेशनच्या संस्थापक निताताई भोसले, यांनी व्यक्त केली. वडकी गाव येथे आज गंगा तारा सोशल फाउंडेशनच्या वतीने वृद्धाश्रम संचालित व निर्माणाधीन अंगणात वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले आहे.
यावेळी सविता औटी, डॉ. अश्विनी शेंडे, शीतल चांदणे, रुपाली शिंदे, अॅडव्होकेट लक्ष्मी माने, विराज कार्चे, अमोल दुर्कर, नितीन नितनवरे, पूजा नितनवरे, रोहिणी भोसले, प्रीतम केदारी, सुशीला सोनवणे, साहिल वाघ, सौरभ सपकाळ, बाळासाहेब भोसले आदी वृक्षारोपणात प्रमुखतेने सहभागी झाले होते. गंगा तारा सोशल फाउंडेशनच्या संस्थापक निताताई भोसले यांनी वडकीगावमधील निर्माणाधीन वृद्धाश्रमांना मदत देणार्यांचे आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे