पंढरपुर, ९ सप्टेंबर २०२०: पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पात्रात असणा-या भक्त पुंडलिक मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून नदी पात्रात असणा-या इतर मंदिरांनाही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. मागील काही दिवसापासून उजनी व वीर धरणातूव सोडण्यात येणा-या पाण्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पंढरपुर सोलापूर रस्त्यावरील पुल बुजण्याच्या मार्गावर आहे.
उजनी व वीर धरण १००% भरले असल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याच विसर्ग करण्यात येत आहे. अजून ही धरण लाभक्षेत्रात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. उजनी धरणामध्ये येणारे पाणी हे वरच्या सर्व धरणांमध्ये भरलेले असल्यामुळे उजनी धरण संपूर्ण भरले व दोन दिवसा पुर्वीच उजनीचे १६ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे ही शेतक-यांसाठी आनंदाची बातमी आहे.
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात १५ हजार क्यूसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदी काठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी