तुमच्याकडील सोने नकली आहे? घरीच पडताळून पहा

भारतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री असो वा पुरूष सर्वांना सोन्याचा मोह आहे. खास करून भारतीय स्त्रियांमध्ये सोन्याविषयी विशेष आकर्षण आहे. तसेच काहीजणांसाठी सोने हे गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही बघितले जाते. परंतु काय होईल जेव्हा आपण हे बहुमूल्य किमतीचे सोने विकत घेऊ आणि ते खोटे असेल. सामान्य लोकांना शुद्ध सोने किंवा खरे सोने आणि बनावट सोने यांमधला फरक करणे अवघड आहे. परंतु हे तपासण्याचे काही वेगळ्या पद्धती सुद्धा आहेत. त्या पद्धतीत तुम्ही आपल्या घरांमध्येही उपयोगात आणू शकता. या पद्धती विना खर्चिक व जास्त वेळ न घालवता तुम्ही वापरू शकता व सोने खरे आहे की खोटे हे पडताळून पाहू शकता.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सोना खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा ते सोने किती शुद्ध आहे हे आपण बघितले पाहिजे.दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शुद्ध पातळीवरचे सोने आपण घेत आहोत सोनाराने लावलेले किंमत त्या सोन्यासाठी योग्य आहे का हेदेखील आपण पडताळून पाहिले पाहिजे. सोन्याची शुद्धता ठरवण्यासाठी हॉलमार्क असतो. हॉलमार्क भारतातली बी आय एस ही संस्था ठरवते. सोन्याची शुद्धता तपासणारी ही एकमेव सरकारी संस्था आहे. जे सोने आपण घेत आहोत त्यावरती हॉलमार्क असणे बंधनकारक असते यावरून आपल्याला त्या सोन्याची शुद्धता किती प्रमाणात आहे हे समजण्यास मदत होते.
सोनी पडताळणीच्या वेगवेगळ्या पद्धती:
१. त्वचा: त्वचा हे सोने खरे आहे की खोटे हे पडताळण्याची एक साधन आहे. जे सोने आपण विकत घेत आहे ते काही काळापुरते जर आपण आपल्या हातामध्ये किंवा त्वचेवर पकडून ठेवले तर त्या भागावरील त्वचेचा रंग बदलतो. जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा बनावट सोने आणि त्वचा यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते. ज्या कारणामुळे त्वचेचा रंग एक तर काळा पडतो किंवा हिरवा होतो. जर सोनी खरे असेल तर अशा सोन्याचा त्वचेवर कोणताही परिणाम होत नाही.
२. चुंबक: तसे बघायला गेले तर लोहचुंबक हे पूर्ण विश्वासू साधन नाही की ज्यामुळे आपण सोन्याची शुद्धता तपासून पाहू शकतो तरीसुद्धा हा सुद्धा एक पर्याय आहे. परंतु यासाठी सामान्य चुंबक उपयोगी पडणार नाही जे आपण फ्रिज किंवा कपाटे या वर लावत असतो. यासाठी ताकत्वर चुंबकाची आवश्यकता असते जे आपल्याला हार्डवेअर मध्ये किंवा दुकानांमध्ये मिळू शकेल. जर सोने शुद्ध असेल किंवा त्यामध्ये कोणतेही ही भेसळ केली गेली नसेल तर असे शुद्ध सोने चुंबकाकडे आकर्षित होणार नाही याउलट जर सोन्यामध्ये इतर धातूंची भेसळ केली गेली असेल तर असे सोने चुंबकाकडे खेचले जाईल. हा एक सोपा पर्याय आहे सोने पडताळण्यासाठी चा.
३. दात: दातांच्या साह्याने सोने पडताळणी एक जुनी पद्धत आहे. सोने हा धातू इतर धातूंच्या तुलनेत मऊ असतो. जर तुम्ही सोने आपल्या दाताखाली दाबले तर तुमच्या दातांचे ठसे सोन्या वरती उठलेले दिसतील. परंतु जर सोन्यामध्ये इतर धातू मिश्र केले गेले असतील सर असे सोने दाताने दाबले जाणार नाही. यामध्ये काही अपवाद सुद्धा आहेत जसे की जर सीशे वरती सोन्याची परत लावली गेली असेल तर येथे ही पद्धत चुकीची ठरू शकते कारण सिस सुद्धा सोन्याप्रमाणे मऊ असते.
४. नाइट्रिक एसिड: सोन्याचे परिक्षण तुम्ही ऍसिडच्या सहाय्याने देखील करू शकता परंतु ॲसिड घरी मिळू शकेल याची शक्यता कमी असते आणि हे थोडे जोखमीचे ही असू शकते. सोन्या वरती नायट्रिक ऍसिड चा थेंब टाकल्यास जर रंगामध्ये बदल होत असेल तर समजून जावे कि सोन्यामध्ये इतर धातूंची भेसळ आहे परंतु जर रंग बदलत नसेल तर सोने शुद्ध आहे.
५. सिरामिक थाळी: हा सर्वात सोपा प्रकार आहे. जर तुमच्याकडे घरात सिरॅमिक थाळी असेल तर थाळीवर सोने घातले असता जर थाळीवर काळ्या रेषा ओढल्या जात असतील तर सोने नकली आहे असे समजावे आणि जर थाळी वरती सोनेरी खोट्या येत असतील तर्सोन यामध्ये कोणतीही भेसळ नाही असे समजते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा