भारतीय लोकशाहीचा भरकटलेला चौथा स्तंभ…

सध्या भारतात कोरोनाने हैदोस घातला असून, दिवसाला ९० हजार नवे रुग्ण आढळत आहेत. तर कोरोना बाबतीत भारत हा जागतिक पातळीवर दुसऱ्या स्थानी आला आहे. आर्थिक परिस्थितीत तर भारताचा GDP हा २३% घटला असून जागतिक पातळीवर भारत हा आर्थिक महामंदीत पहील्यास्थानी विराजमान आहे. कोरोनामुळे अनेक तरुण हे बेरोजगार झालेत. तर या बाबतीत ही भारताची स्थिती फारच डळमळलीये.
पण या सर्व प्रकारात भारतीय मिडीया ही जागतिक पातळीवर सुरु आसलेल्या महामारीचे कवरेज हे तेव्हा केली जेव्हा देशात एक किंवा दोन रुग्ण होते आणि मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. तर आज देशात ४३ लाखांच्या पार संख्या गेली असताना मात्र आज लोकशाहीला जाणीवपुर्वक भरकटवत आहे का? हा प्रश्न उपस्थितीत होत आहे.
सुशांत सिंग राजपूत यांने आत्महत्या केली. पण त्यानंतर देशात असे वातावरण निर्माण झाले ज्यामधे संपूर्ण प्रसारमाध्यमांना लोकशाहीला भरकटवण्याचा मुद्दाच जणू मिळाला. याआधी देखील अनेक आभिनेत्या, दिग्गजांचे निधन झाले पण त्या वेळी एवढा कांगावा करण्यात आला नाही. परविन बाबी, दिव्या भारती एवढं मागे कशाला जायचे तर काही वर्षांपुर्वी एका दिग्गज नेत्याचा अपघाती निधन झाले. पण, शरीरावर काही जखमा नको की गाडी धडकली त्याला डेन्ट सोडला तर दुसरे काही नुकसान नाही. त्यावेळी प्रसारमाध्यामांनी बघ्याची भूमिका घेतली. नंतर विरोधक असो की सत्ताधारी त्यांनी कधी प्रश्न उपस्थित केलाच नाही. या सर्व घटनांवर….
जग सध्या कोरोनाशी लढा देतोय त्या बरोबर अनेक वेगवेगळ्या देशात दुसऱ्या परिस्थितीने अर्थात अर्थिक, बेरोजगारी आणि महाभंयकर रौद्र रुप धारण करणारा कोरोना अश्या परिस्थितीचे चिंतन केले जात आहे.

पण आज भारतातील परिस्थिती पुर्ण जगावेगळी आहे.

सुशांत सिंग राजपूत ने आत्महत्या का केली?

सुशांतची आत्महत्या की हत्या?

रिया चक्रवतीनेच मारला त्याला?

सुशांत नेपोटिझमचा बळी ठरला?

आम्ही मुकेश भट्टचे चित्रपट पहाणार नाही.

करण जोहर ने चुकीचे केले.

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस सुशांतचे प्रकरण हातळण्यास असक्षम केस CBI कडे देण्यात आली.

सत्याचा विजय झाला.

लवकरच आता CBI खऱ्या आरोपीला पकडणार.

CBI ची टिम रियाच्या घरी.

केस मिळताच CBI अॅक्शन मोड मधे.

रियाची आठ तास तीन दिवस सलग चौकशी.

रिया घरात बसून पाहत आहे टिव्ही.

रिया चौकशीला निघणार. रियाने आता आपल्या घरची पहीली सीढी उतरली.

रिया या गाडीतून जाणार.

रियाला ड्रग्स प्रकरणी अटक.

रियाने कबूल केले सुशांत पण तिच्या बरोबर ड्रग्स घ्यायचा.

रिया चक्रवर्तीने केला होता सुशांत वर काला जादू.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात बाॅलिवूड चित्रपटसृष्टीतील नकली घोड्यावर बसणारी राणीची उडी

सुशांत प्रकरणात घराणेशाहीवर आवाज उठवणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. सुरवातीला तिने संपूर्ण बाॅलिवूडचा नागडा चेहरा सर्व सर्वसामान्यांसमोर आणला खरा पण, ती खरंच लढा देत होती की लोकांना वेड्यात काढत आहे. हा प्रश्नच सध्याच्या घडीला निर्माण झालाय. बाॅलिवूडच्या घराणेशाहीकडून अचानक या अभिनेत्रीने राजकारणात उडी घेत थेट राज्यसरकारवच टिकेची झोड सोडू लागली. त्यात “मुंबई हे आपल्याला पाकव्याप्त कश्मिर सारखं वाटतंय आणि आता भिती वाटते” हे विधानच केले. बरं हेच विधान जर अमिर, सलमान, शाहरूख यांच्या कडून झाले आसते तर झोपलेली मिडीया आणि लोकशाही यांनी पाकिस्तान मधे जाण्याचा सल्ला दिला असता. पण कंगनाने केलेल्या विधानाला जागृत असलेल्या लोकशाही आणि चौथ्या स्तंभाने समर्थन दिले आणि आज घडीला सुशांत सिंग प्रकरण राहीले बाजूला पण कंगनाचा मुद्दा घेऊन पुन्हा चौथा स्तंभ जागृत पत्रकारिता करु लागलाय.

एका पत्रकाराची पत्रकारिता नाही तर स्वतःचेच कोर्ट

भारतीय वृत्त माध्यमे लोकशाहीला कमी भरकवटत होती ज्यात एका महाशयानीं तर आपल्या वाहिनींवर चक्क कोर्टच चालू केले. सुशांत प्रकरणात आजही जोरदार चालू असलेल्या कवरेज म्हणजे “पु…ता है भा..त”, पत्रकारितेला लाजवेल अशी या पत्रकाराची कामगिरी सध्या चालू आहे. ज्यामधे तेच महाशय न्यायाधिश, साक्षीदार, पोलीस, वकील आणि शिक्षा ही तेच देणार पण आरोपी मात्र त्यांच्या नजरे नुसार ठरणार. या पत्रकाराने तर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पासून ते गृहमंत्री अनिल देशमुख पर्यंत नेत्यांना ऐकेरी उल्लेख करत आजची भारतीय लोकशाहीचा असणाऱ्या चौथ्या स्तंभाचा चेहरा दाखवला. अनेकांनी तर त्याला कोण कुठला कुत्रा पत्रकार, दलाल पत्रकार, विकलेला पत्रकार, सुपारी घेऊन पत्रकारीता करणारा पत्रकार अशी उपमा दिल्या.

हि परिस्थिती आजच्या लोकशाहीवर अजूनही चालू असून प्रसारमाध्यमेच याला हवा द्यायला जबाबदार ठरलीत. पण या उलट ही स्थिती,

जागतिक पातळीवर भारत कोरोना आकडे वारीत दुसऱ्या क्रमांकावर.

दिवसाला ९० हजार रुग्ण सापडण्याचा नवा उच्चांक.

भारतात कोरोना शिगेला.

सरकार या परिस्थितीत कुठे कमी पडतयं का?

सरकारने कोरोना व्यवस्थित हाताळला आहे का?

किती लोक मृत पावली रुग्णांची संख्या काय आहे?

अनेक कंपन्या बंद पडल्या तर काही पगार न देता कर्मचाऱ्यांची हकालपट्टी का करण्यात येत आहे?

देशातील तरुणांना बेरोजगारी आणि कोरोनामुळे काय नैराश्य आले?

हे प्रश्न लोकशाहीला आजच्या घडीला अजिबात नाहीत का असावीत जर प्रसारमाध्यमांना एका कलाकारानेंच TRP आणि पैसा मिळत असेल तर….

सुशांत सिंग राजपूतला भारतरत्न पुरस्कार द्या आणि….

एकंदरीत सर्व प्रकरण पाहता आभिनेता सुशांत सिंग राजपूतला मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात भारतरत्न द्या, त्या मागोमाग कंगना रणौत हिला हि भारतरत्न देऊन शिवसेना नेते संजय राऊत यांना धन्वतरी पुरस्कार आणि पत्रकार अ..ब ला शांततेचा नोबेल पुरस्कार देऊनच हे प्रकरण काय ते शांत होईल. तर राहीला रिया चक्रवर्तीचा प्रश्न तर सरळ तिने सुशांत प्रकरणी कायद्याने कडक शिक्षा करुन देशाबाहेर सोडाव. तरच प्रसार माध्यमांना मुळ काय ते स्वरुप भेटेल. अन्यथा सकाळी उठा रियाच्या मागे पळा परिस्थिती ती जिंवत असेपर्यंत निर्माण झाली आहे.
पण या सर्व देशाच्या परिस्थितीवर भाष्य करणारे भारतीय लोकशाहीचा चौथ्या स्तंभांच्या या कवरेजमुळे उद्या लोकशाही खरंच यावर विश्वास ठेवेल? की जो जागृत पणा लोकांमध्ये आहे तो असाच या सुशांत, रिया, शौविक, कंगना प्रकरणापुढे ही असेल?

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

8 प्रतिक्रिया

  1. ज्या विचारांनी मिडीयाने काम करायला हवं,
    तो विचार कुठे तरी भरकटलायं,
    ज्या मिडीयाचा देशाच्या इतिहासात मोलाचा भाग होता,
    आता तोच मिडीया TRP आणि पैशांमध्ये हरवलायं… 🙏🥺

  2. खरं खूप चांगले वाटले की आपल्यासारखे पत्रकार लोक अजूनही जिवंत आहेत.. जी खरी बाजू चोख रित्या मांडतात.. आपल्याला उज्ज्वल पत्रकारितेच्या भविष्यासाठी शुभेच्छा… 🙏

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा