भोर, १२ सप्टेंबर २०२० : भोर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे भोर शहर काही काळासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भोर शहरात उद्या (रविवार दि.१३) पासून ते दि.१९ पर्यंत या सात दिवसांचा पूर्ण लॉक डाऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली.
भोर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या रोज वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील करोना बाधितांचा आकडा दीडशेच्या वर गेला असून यात ६५ शासकीय, निमशासकीय, तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश असून, शहरातील बहुताश वॉर्डात, पेठांत, गल्ल्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याची गंभीर दखल घेऊन आमदार संग्राम थोपटे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आज (दि. ११) तातडीची बैठक बोलावली होती.
आमदार थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील वाढत्या कोरोना आजाराच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या सात दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे. बंदच्या काळात फक्त रुग्णालये आणि औषधांची दुकाने चालू राहतील.असेही त्यांनी सांगितले आहे.
या बैठकीला भोरचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार थोरात, भोर तालुका गटनेते सचिन हर्णसकर, नगसेवक चंद्रकांत मळेकर, अमित सागळे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी